X
X

धुळ्यात कंटेनर -बसचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू, ३५ जखमी

READ IN APP

सहा जणांची प्रकृती गंभीर

धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३५ जण जखमी आहेत. जखमी प्रवाशांतील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद – शहादा बस (एमएच २० बीएल ३७५६) आणि कंटेनरमध्ये धडक झाली. या अपघातात बसचालक मुकेश पाटीलसह १५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस चालकच्या बाजूला जोरदार धडक बसल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात बसचा चक्काचूर झालेला आहे.


अपघाताताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. गावकऱ्यांनी तात्काळ जखमींची मदत केली. जखमींना दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मयतांची नावे

1) शकील मो. बागवान, शहादा

2)प्रेरणा श्रीराम वंजारी, शहादा

3) इद्रिस नासिर मणियार, तळोदा

4) मुकेश नगीण पाटील, बस चालक, शहादा

5) हस्तिक आनंद वाघ, ठाणे

6) वृषाली दीपक भावसार, शहादा

7) संजय ताराचंद अलकरी, शहादा

8) संतोष कारभारी ठोंबरे, औरंगाबाद

इतरांची ओळख पटलेली नाही.

23

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on: August 19, 2019 7:12 am
Just Now!
X