14 August 2020

News Flash

वाशीम: ट्रक व कारच्या अपघातात तीन ठार

वाशीम जिल्ह्यातील घटना;एकाच कुटुंबातले तिघे ठार 

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशीम जिल्ह्यातील चांडस गावानजीक ट्रक व कारच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याची घटना आज, ५ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

मूळचे सावरगाव बर्डे येथील रहिवासी तथा वाशीम येथील सिव्हिल लाईन भागात राहणारे कड परिवारातील किसन ग्यानुजी कड (वडील), जिजाबाई किसन कड (आई), अमोल किसन कड (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत. अमोलच्या सासूची प्रकृती ठिक नसल्याने किसन ग्यानुजी कड, जिजाबाई किसन कड हे मुलगा अमोल कड याच्यासोबत कारने (क्र. एम.एच. ३७ जी २०७९) डोणगाव येथे भेटीसाठी जात होते. दरम्यान चांडस गावानजीक मेहकरवरून येणाºया ट्रकने (क्र.आर.जे.०४ बी.बी.४४४७) कारला जोरदार धडक दिली. या घटनेत किसन कड, जिजाबाई कड व अमोल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघात एवढा भीषण होता की संपूर्ण कार चक्काचूर झाली. ग्रामस्थांनी त्यांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतक अमोलची पत्नी व मुलगा अगोदरच डोणगाव येथे गेले होते. अमोल कड हे व्यवसायाने वाशीम येथे वकील होते. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने कड परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 8:24 pm

Web Title: truck and car accident in washim three killed scj 81
Next Stories
1 कारंजा येथील गुरु मंदिरातून आता थेट ऑनलाइन दर्शन
2 मुंबई पोलीस आयुक्तांनी काढलेल्या बदल्यांच्या आदेशाला मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची स्थगिती
3 लॉकडाउन काळात सत्कार; भाजपाच्या ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा
Just Now!
X