कोल्हापूरातील किणी टोलनाक्यावर शुक्रवारी मध्यरात्री ट्रक आणि शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघातात १६ जण जखमी झाले असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला.

सावंतवाडीच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसने पाठीमागून ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, चालक आणि वाहकाच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. मागच्या काही महिन्यात राज्याच्या वेगवेगळया भागात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला अपघात झाले आहेत.