News Flash

पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान, पुरीचे पीठ पायाने तुडवत असल्याचा व्हिडिओ आला समोर

तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडतं का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकीच किळस आणणारा प्रकार घडला आहे

तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडतं का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार घडला आहे. पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारे पीठ कामगार पायाने तुडवत (मळत) असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील हा व्हिडीओ आहे. लोकसत्ताच्या हाती हा व्हिडीओ लागला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलीस आणि अन्न व भेसळ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

दापोडी मध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्यांचे प्रमाण असून याठिकाणी परप्रांतीय देखील राहतात. येथील एका ठिकाणी हा किळसवाणा प्रकार सुरु होता. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कामगार काम करत आहेत. यावेळी व्हिडीओ काढणारी व्यक्ती त्यांच्याशी बोलत आहे. अस्वच्छ असणाऱ्या या जागेत सुरु असलेला हा प्रकार पाहून यापुढे पाणीपुरी खाताना अनेकजण नक्की विचार करतील.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील दापोडी, औंध (खडकी रोड), चिखली (पाटील नगर), भोसरी (शांती नगर), सिंहगड(नांदेड फाटा) येथे हा गोरख धंदा चालतो. अनेक ठिकाणी असे प्रकार सुरु असल्याची शक्यता आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय आहेत. मशीनने पुरीचे पीठ मळायचे असल्यास त्यासाठी तब्बल १३ लाख रुपये मोजावे लागतात, त्यामुळे अनेक परप्रांतीय कामगार पायाने आणि अस्वच्छ ठिकाणी पुरीचे पीठ मळण्याचा पर्याय अवलंबतात.

अशा प्रकारची घाणेरडी पुरी खाल्ल्याने जुलाब, उलटी, टायफाइड, कावीळ, अन्न विषबाधा इत्यादी आजार होऊ शकतात. त्यामुळे स्वच्छ आणि परवानाधारक ठिकाणीच असे खाद्य पदार्थ खावेत किंवा खात्री करावी असं डॉ संदीप मेहेत्रे यांनी सांगितलं आहे.

एफडीआयचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांना या व्हिडीओबद्दल विचारलं असता, ‘ तक्रार आल्यास आम्ही तात्काळ कारवाई करू. कायद्याच्या दृष्टीने पायाने पीठ तुडवणे अत्यंत चुकीचे आहे. असा काही प्रकार आढळल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री नंबर वर नागरिकांनी फोन करावा’, असं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2019 9:28 am

Web Title: truth exposed in video of how workers made pani puri
Next Stories
1 संघाला घोड्यास लगाम घालणे जमले नाही: शिवसेना
2 खासदारांनी उमेदवारी निश्चित समजू नये; रावसाहेब दानवेंचा इशारा
3 मोदी-शहा यांचे ‘लक्ष्य महाराष्ट्र’!
Just Now!
X