दुर्मिळ जातीच्या कासवाची ४० लाख रुपयांत विक्री करण्याचा प्रकार औरंगाबाद शहरात समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. कासव विक्री करणारा अमोल साळवे हा शिक्षण संस्थाचालक असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. तो फरार असून गणेश चापा पवार (वय ६२, रा. भानुदास नगर, औरंगाबाद) व नरेश गणेश पवार या दोघांना पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली. हे कासव चीन किंवा इंडोनेशियामध्ये औषध निर्मितीसाठी विक्री करण्याचा आरोपीचा उद्देश होता, असे पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी सांगितले.
अंधश्रद्धेपोटी व औषधासाठी म्हणून कासवांची तस्करी केली जाते. शहरातील एकनाथ रंगमंदिराच्या बाजूस असणाऱ्या हॉटेलमध्ये कासव खरेदी-विक्रीचा प्रकार होणार असल्याचे पोलीस हवालदार मंगेश जाधव यांना समजले. दुर्मिळ जातीच्या कासवाची विक्री होणार असल्याचे लक्षात येताच साध्या वेशातील पोलिसांनी आरोपी अमोल साळवे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. रात्री इनोव्हा गाडी (एमएच २१ व्ही. ८६५२) मधून आरोपी अमोल साळवे, त्याचा सहयोगी शेख नाजीम (वय २७, रा. संजयनगर, बायजीपुरा) हे दोघे आले. मात्र ही खरेदी करणारी व्यक्ती कोण हे समजू शकले नाही. पोलिसांनी, ते कासव आम्हाला हवे आहे, असे सांगून त्याची किंमत ठरविली. तेव्हा अमोल साळवे यांनी कासवाची किंमत ४० लाख असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. यात अमोल साळवे व शेख नजीम पळून गेले. तर गणेश चापा पवार व नरेश गणेश पवार या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे कासव कोणत्या जातीचे हे ठरविण्यासाठी त्याचा ताबा पशुसंवर्धन विभागाकडे देण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश