17 January 2021

News Flash

तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण

तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत माहिती दिली.

नागपूर महापिलाका आयुक्त तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. माझ्या संपर्कातील सर्वांनी करोना चाचणी करुन घ्यावी, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत करोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली. मला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू.

दरम्यान, करोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका  तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 9:05 am

Web Title: tukaram mundhe corona positive nck 90
Next Stories
1 १ सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध कायम, मुख्यमंत्र्याचे संकेत
2 महाड इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १८ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न
3 स्वच्छतेत पालघरची पिछाडी
Just Now!
X