तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात ललिता पंचमीदिनी सुमारे सहा लाख भाविकांची गर्दी होती. कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी आई राजा उदेऽऽ उदेऽऽ, सदानंदीचा उदेऽऽ उदेऽऽच्या जयघोषाने अवघी तुळजापूर नगरी दुमदुमली. दुपारी २ वाजता हजारो भाविकांनी मंदिरातील गर्दीचा ताण पाहून महाद्वाराचे दर्शन घेतले. हजारो भाविकांना दर्शन न मिळाल्याने भाविकांत प्रचंड नाराजी होती.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीनिमित्ताने तुळजाभवानीस सकाळी ७ वाजता सुरूझालेले अभिषेक दुपारी ११ पर्यंत चालले. त्यानंतरच्या एक तासात देवीची नित्योपचार पूजा व या दिवशी करण्यात येणारी रथालंकार महापूजा मांडण्यात आली होती. रथालंकार महापूजाप्रसंगी देवी चांदीच्या रथामध्ये बसून रथ हाकत असल्याचा देखावा मांडला होता. महंत तुकोजीबुवा व महंत चिलोजीबुवा यांनी देवीची पूजा केली.
शनिवारी दिवसभरापासून भाविकांची गर्दी वाढत गेली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने व पंचमी दिवस असल्याने पायी चालत येणारी भाविकांची गर्दी वाढत गेली. हैदराबाद, हुमनाबाद, बिदर, गुलबर्गा, भालकी, जहिराबाद यांसह महाराष्ट्रातील सर्व भागातून भाविकपायी येत असल्याचे चित्र आहे.
िनबाळकर दरवाज्यासमोर गर्दी थोपविण्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी लहान मुले व वृद्धांना आत जाऊ नका, असा सल्ला दिल्याने हजारो भाविकांनी बाहेरूनच दर्शन घेतले.

jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन