हिंगोली जिल्ह्य़ातील शेतकरी हैराण

अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील हळद वाहून गेली आहे. जेथे लागवड झाली होती, त्या शिवारात पाणी साठलेले असल्याने हळदीचे कंद कुजू लागले आहेत. तसेच पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळद उत्पादक शेतकरी आíथक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात सुमारे २३ ते २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी हळद लावली होती. वसमत व कळमनुरी तालुक्यात हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ८ ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे पुरते नुकसान झाले आहे. तशीच हळदीचीही अवस्था झाली आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे, लोहगाव, दाटेगाव या परिसरातील ओढय़ाकाठच्या शेतकऱ्यांची हळद मोठय़ा प्रमाणात वाहून गेली. हिंगोली बाजार समिती हळद विक्रीसाठी प्रसिध्द बाजारपेठ असल्याने नागपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या सारख्या इतर जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणावर येथे हळद विक्रीसाठी येते. गतवर्षी हळदीला प्रतिक्विंटल ९ हजाराच्यावर भाव मिळाला होता. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हळद पिकाकडे वळला. यावर्षी मोठय़ा प्रमाणात शेतकऱ्यांनी हळद लावली होती. गेल्या आठवडय़ात हिंगोलीच्या मार्केटयार्डात हळदीला प्रतििक्वटल ७ हजाराच्यावर भाव मिळत होता. आता तो ६ हजारावर येऊन ठेपला आहे.

कृषी विभागाने आता हळद शिजविण्यासाठी ५ लाख रुपये खर्चाच्या या कुकरला दोन लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हळदीचे कं द कुजत असल्याने शेतकरी हैराण आहेत.