ट्विटरने आज अनेक जणांच्या हँडलसमोरचं ब्लू टिक अर्थात Verified हे चिन्ह काढून टाकण्याची मोहीम राबवली होती. मात्र, त्यानंतर काही वेळातच ट्विटरला उपरती होऊन पुन्हा ब्लू टिक सक्रिय करण्यात आले. आधी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि आता सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबाबतीतही असंच घडलं आहे.

काही वेळापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हँडलवरील ब्लू टिक काढून टाकण्यात आली होती. मात्र आता ती पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. संघाचे अनेक नेत्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढण्यात आल्याचं वृत्त आहे. मोहन भागवत यांचं ट्विटर हॅण्डल २०१९मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. पण, त्यावरून एकही ट्विट करण्यात आलेलं नाही.

आणखी वाचा- सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ‘ब्लू टिक’ हटवली

ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचं नाव बदललं गेलं असेल किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल वा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील तर ब्लू टिक हटवली जाते.

आणखी वाचा- “…अन्यथा परिणामांना तयार राहा”, केंद्र सरकारचा Twitter ला शेवटचा इशारा!

खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी ट्विटरकडून ब्लू टिक अर्थात ब्लू व्हेरीफाईड बॅच दिला जातो.

आणखी वाचा- समजून घ्या : Twitter वरील Blue Tick इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? कोणत्या कारणांमुळे ते काढून टाकलं जातं

तसंच काही वेळापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टिक ट्विटरने हटवली होती. केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने अकाऊंटसमोर पुन्हा ब्लू टिक सक्रिय केली आहे.