जेएनपीटी उरण येथील स्लज ऑइल व्यवसायातून झालेल्या संतोष ठाकूर खूनखटल्यातील दोघांना अलिबागच्या सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे.     नवघर उरण येथील संतोष ठाकूर जेएनपीटी बंदरात स्लज ऑइलचा व्यवसाय करीत होते. सतीश यशवंत पाटील हे त्यांचे व्यवसायातील स्पर्धक होते. पाटील यांचे मित्र सुमित येरुणकर हे या व्यवसायात प्रवेश करू इच्छित होते, मात्र संतोष ठाकूर यांचा व स्लज ऑइल व्यावसायिक प्रकल्पग्रस्त संघटनेचा याला विरोध होता. याच व्यावसायिक वादातून संतोष ठाकूर यांची २४ एप्रिल २०१० मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.    सदर खटल्याची सुनावणी अलिबागच्या सत्र न्यायालयात झाली. या सुनावणीदरम्यान तब्बल २७ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने नोंदवल्या. या सुनावणीत सुमित येरुणकर आणि त्याचा साथीदार राकेश राणे याला खुनाच्या गुन्ह्य़ासाठी न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले. दुसरे सत्र न्यायाधीश एच. ए. पाटील यांनी सुमित येरुणकर आणि राकेश राणे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अनुक्रमे सहा आणि पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तर कटातील अन्य चार आरोपींची सुटका करण्यात आली. या प्रकरणात मुख्य शासकीय अभिवक्ता म्हणून प्रसाद पाटील यांनी काम पाहिले.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
College Girl Murdered by Friends for Ransom
धक्कादायक : विमाननगर भागातून अपहरण झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचा मित्राकडूनच खंडणीसाठी खून
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…