10 July 2020

News Flash

अडीच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी व अडीच वर्षीय पीडित मुलगी दोघांचेही घर एकाच परिसरात आहे

(संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्यात एका अडीच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अडीच वर्षीय मुलीवर १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बलात्कार करणारा अल्पवयीन आरोपी व अडीच वर्षीय पीडित मुलगी दोघांचेही घर एकाच परिसरात आहे. ही पीडित चिमुकली  या अल्पवयीन मुलाच्या घरी शनिवारी दुपारी खेळायला गेली असता आरोपीने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. या घटनेची माहिती चिमुकलीने तिच्या आईला दिली. पीडित मुलीचे वडील त्यावेळी शेतात कामाला गेले होते. मुलीच्या आईने घटनेची माहिती तिच्या वडिलांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी लोणी टाकळी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला अटक करून बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेने गावात संतापाचे वातावरण आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:05 am

Web Title: two and a half year old girl abused abbn 97
Next Stories
1 अपंग-मतिमंद मुलीवर पाच नराधमांकडून बलात्कार
2 ‘नाणार’साठी ७० टक्के जमीनमालकांच्या संमतीसह सुधारित प्रस्ताव
3 संशोधन होऊनही शेतकऱ्यांचे उत्पन्न कमीच
Just Now!
X