29 September 2020

News Flash

डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी दोन मृतदेह आढळल्याने खळबळ

चिखले व नरपड समुद्र किनाऱ्यावर आढळले मृतदेह

डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी दोन अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वीही या किनाऱ्यावर मृतदेह आढळल्याची घटना घडली होती.

चिखले व नरपड समुद्र किनाऱ्यावर हे दोन्ही मृतदेह नागरिकांना आढळून आले. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा दिसत नसला तरी गळ्यातील दोऱ्यावरून एक व्यक्ती ख्रिश्चन समाजाचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. चिखले येथे घोलवड पोलीस तर नरपड येथे डहाणू पोलीस पोचले असून, दोन्ही ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनांचा  पोलीस अधिक तपास करत आहेत.

मंगळवारी गोराई येथील समुद्रात लकी स्टार बोट बुडाली होती. बोटीतील दोन मच्छिमार बेपत्ता आहेत, हेच ते दोघे असावे असा अंदाज असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 1:54 pm

Web Title: two bodies were found on the same day at dahanu beach msr 87
Next Stories
1 धक्कादायक! दहावीतील गुणवंत विद्यार्थीनीवर बलात्कार; व्यथित झाल्याने मुलीची आत्महत्या
2 वर्धा : ग्रामीण भागात बँकिंग व्यवहारांच्या सुलभीकरणासाठी महिला बचत गटांना संधी
3 प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या
Just Now!
X