News Flash

मांजरा नदीत बुडून कासराळीच्या दोन युवकांचा मृत्यू

पाण्यात उतरल्यावर या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे या दोघांचाही बुडून मृत्यू झाला

तेलंगणातील बोधन या ठिकाणाहून कासराळई या आपल्या गावी परतत असताना मांजरा नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. नदीच्या कडेवर असलेल्या एका मोठ्या डबक्यात हे दोघे पोहण्यासाठी उतरले. तिथे या दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला.

इफ्तेकार मोईन शेख (वय-२० वर्षे) आणि नवाज नजिर कुरेशी(वय २१) अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही त्यांचा आणखी एक मित्र अमजद धामनगावे याच्यासह दुचाकीवरून बोधनला गेले होते. तिथून परतत असताना तिघांनीही नदीवर अंघोळ करण्याचे ठरवले. या तिघांपैकी अमजद धामनगावे हा काठावर पोहत होता. तर इफ्तेकार आणि नवाज हे दोघेजण मध्यभागात गेले तिथे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते दोघेही बुडाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. गावकऱ्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी या दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण त्याचा उपयोग झाला नाही. ११ नोव्हेंबरला दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या दोघांचेही आई वडील मजुरी काम करतात. या घटनेमुळे कासराळी गावावर शोककळा पसरली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 10:59 am

Web Title: two boys drown to death in manjra river
Next Stories
1 #LoksattaPoll: ६५ टक्के वाचक म्हणतात, औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरणाचा आग्रह योग्यच
2 जलयुक्तवर चारशे कोटी खर्चूनही शिवारे कोरडी
3 उशिरापर्यंत फटाके वाजवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे
Just Now!
X