06 August 2020

News Flash

आष्टीत दोन भावंडांकडून मित्राचा खून

अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत असलेले दोघेही सख्खे भाऊ अल्पवयीन आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

खंडणीचा बनाव; आरोपी अल्पवयीन

बीड : चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चौदा वर्षीय मुलाचा मृतदेह रविवारी सापडल्यानंतर या प्रकरणी सख्ख्या दोन अल्पवयीन भावांना पोलिसांनी अटक केली. सोमवारी दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. किरकोळ वादामधून सख्ख्या दोन भावांनी मित्राचाच गळा दाबून खून केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपहरण आणि खंडणीचा बनाव केल्याचे तपासात उघड झाले.

आष्टी तालुक्यातील केरुळ येथील गणेश एकनाथ आंधळे (वय १४) हा नववीच्या वर्गात शिकणारा मुलगा १२ डिसेंबर रोजी शाळेतून आल्यानंतर सायंकाळी खेळायला म्हणून बाहेर गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध करूनही सापडत नसल्याने कुटुंबीयांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली. दरम्यान रविवारी सकाळी गावाजवळील मदानात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात गणेशचे अपहरण करण्यात आले असून त्याला जिवंत पाहायचे असेल तर रात्री आठपर्यंत रस्त्याच्या जवळ एका ठिकाणी वीस लाख रुपयांची बॅग आणून ठेवा. पोलिसात गेलात तर गणेशला मारून टाकू असा मजकूर होता. चिठ्ठी सापडताच गणेशच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे याबाबत सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवल्यानंतर काही वेळातच गावापासून एक किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर गणेशचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून आणिअ‍ॅसिड टाकून मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गणेशच्या दोन मित्रांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्यची कबुली दिली. अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकत असलेले दोघेही सख्खे भाऊ अल्पवयीन आहेत. मृत गणेशचे वडील ट्रकचालक असून अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थिती आहे. तर आरोपीचे आई-वडीलही ऊसतोडीला गेलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2018 12:04 am

Web Title: two brothers kill friend over minor dispute in ashti taluka
Next Stories
1 पाण्याअभावी मोरांवर स्थलांतराची वेळ
2 मुलीच्या लग्नादिवशीच पित्याची आत्महत्या
3 भाजपाचे नेतृत्व नितीन गडकरींना देण्याची मागणी
Just Now!
X