भंगार गोडाउन शेजारी उभ्या असलेल्या बंद कारमध्ये गुदमरून दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

सुहेल खान (वय -६) आणि अब्बास खान (वय-४) अशी दोघांची नावं आहेत. हे दोघे संध्याकाळी खेळताना या गाडीत बसले असावेत दरम्यान गाडी बंद झाली आणि ते त्या दोघांना उघडता आली नाही, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले असून, महाड औद्योगिक वसाहत पोलीस अधिक तपास करीत आहेत.