08 April 2020

News Flash

मांडाखळीत वीज पडून दोन ठार, दोन जखमी

परभणीपासून आठ किलोमीटर अंतरावरील मांडाखळी येथे वीज पडून दोन ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी

| June 5, 2014 01:35 am

परभणीपासून आठ किलोमीटर अंतरावरील मांडाखळी येथे वीज पडून दोन ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला.
मांडाखळी परिसरात दुपारी चारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पाऊस आल्याने चार युवक विश्वनाथ शिराळे यांच्या शेतातील झाडाखाली थांबले होते. वादळी वारे व पाऊस सुरू असताना विजेचा कडकडाट चालू होता. झाडावर वीज पडल्याने सज्जन बन्सीधर जोत व किरण सुखदेव गायकवाड हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले, तर ओंकार विश्वनाथ शिराळे व प्रवीण श्रीधर शिराळे हे गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांनी तातडीने जखमींना परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार चालू आहेत. दोघांची प्रकृती चांगली असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2014 1:35 am

Web Title: two died and two injured in thunderbolt
टॅग Parbhani,Thunderbolt
Next Stories
1 मुंडे यांच्या निधनाबद्दल हिंगोलीत उत्स्फूर्त ‘बंद’
2 कडकडीत ‘बंद’ पाळून परभणीकरांची श्रद्धांजली
3 ‘मुंडे यांच्या नसण्यामुळे आता पोरकेपणाची सल’
Just Now!
X