25 May 2020

News Flash

पुणे-सातारा महामार्गावर अपघात; दोन जण ठार

पुणे - सातारा महामार्गावर गौरीशंकर महाविद्यालयासमोर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारीच्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जखमी झाले.

| May 29, 2015 02:10 am

पुणे – सातारा महामार्गावर गौरीशंकर महाविद्यालयासमोर बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोटारीच्या झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जखमी झाले.
रमेश विष्णू चौधरी, सुरेश चंद्रकांत चौधरी, अशोक पांडुरंग चौधरी, हे मुंबई येथील व्यापारी असून ते घेरा केंजळ (ता वाई) येथे गावी आले होते.त्यांच्या मित्राच्या वडिलांचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी गावातीलच रतन शंकर वाडकर याच्यासह रेणावळे पुनर्वसित लिंब ता. सातारा येथे जात असताना महामार्गावर लिंब गावच्या हददीत गौरीशंकर महाविदयालयासमोर आल्यावर रस्त्यावरील मोठया खडडयातून मोटार गेल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून मोटारीने तीन चार कोलांट उडया मारुन गाडी एका बाजूला जाऊन आदळली. त्यात रमेश विष्णू चौधरी (वय २८) रतन शंकर वाडकर (३८)या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश आणि अशोक चौधरी गंभीर जखमी झाले असून त्यांना सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2015 2:10 am

Web Title: two died in pune satara road accident
टॅग Satara,Wai
Next Stories
1 पोलिसांचा हवेत गोळीबार; मात्र, टेम्पोसह चोरटे पसार!
2 परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाला अखेर चालना
3 उस्मानाबादेत ३५६ गावांसाठी १०० कोटींची मदत
Just Now!
X