इचलकरंजी नजीक तारदाळ येथे शहापुर पोलिसांनी सोमवारी दोन तोतया पोलिसांना अटक केली . या दोघांकडून एक गावठी बनावटीची पिस्तुल व एक दुचाकी असा ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोहन सुरेश पवार (वय २०, निपाणी) व प्रकाश मारुती कुंभार (वय ४० चिकोडी )अशी त्यांची नावे आहेत.
तारदाळ येथे एका घरात जाऊन या दोघांनी आपण कर्नाटक पोलीस असल्याचा बहाणा करून घर झडती घेण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच शहापुर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना अटक केली.
यातील मोहन पवार याच्या विरोधात निपाणी पोलीस ठाण्यात तोतया पोलीस म्हणून यापूर्वी देखील गुन्हा दाखल झाला आहे, असे पोलीस निरीक्षक प्रकाश निकम यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 9:58 pm