09 March 2021

News Flash

गांधील माश्यांच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू

पाटण तालुक्यातील महिंद येथील घटना

प्रतीकात्मक छायाचित्र

घराच्या टेरेसवर खेळत असताना गांधील माशांनी केलेल्या हल्ल्यात दोन मुली गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ढेबेवाडी विभागातील महिंद (ता. पाटण) येथे दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनुष्का दिनेश यादव (वय ११, रा. येळगाव, ता. कराड) व शेजल अशोक यादव (वय ८, रा. महिंद, ता. पाटण) अशी गांधील माशांनी
केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.

महिंद येथे घराच्या टेरेसवर अनुष्का व शेजल या दोन मुली सोमवारी दुपारच्या सुमारास खेळत होत्या. त्यांच्या घराच्या शेजारी एक पडके पत्र्याचे घर असून त्या घरामध्ये गांधील माशांचे पोळे आहे. मुली टेरेसवरती खेळत असताना माकडाने पडक्या घराच्या पत्र्यावरती उडी मारल्याने त्या घरातील माशा उठल्या व त्यांनी टेरेसवर खेळत असलेल्या मुलींवर हल्ला केला. या हल्ल्यात माशांनी चावा घेतल्याने मुलींचे अंग सुजले होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने घरातील नातेवाईक व इतर लोक टेरेसवर धावत आले. नातेवाईकांनी त्वरित दोन्ही मुलींना उचलून तळमावले येथे रुग्णालयात हलवले. परंतु त्यातील एका मुलीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलीवर उपचार सुरू होते. मात्र रात्री उशिरा तिचाही मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनुष्का सुट्टीनिमित्त आली होती मामाच्या गावी करोनामुळे टाळेबंदी असल्याने सुट्टीसाठी अनुष्का यादव महिंद येथे मामाकडे चार महिन्यांपासून राहिली होती. या दरम्यान ती शेजल बरोबर खेळत होती. दोघींची चांगली गट्टी जमली होती. दुपारच्या सुमारास त्या दोघी खेळत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने दोघींचाही मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 9:17 pm

Web Title: two girls killed in gandhi fly attack in satra scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, जाणून घ्या किती रुग्ण झाले बरे?
2 दसरा मेळाव्याचे नव्हे शिमग्याचे भाषण; चंद्रकांत पाटील यांचा पलटवार
3 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यंदा शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – अमित देशमुख
Just Now!
X