10 August 2020

News Flash

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प, महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत . खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला आहे.

मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली, त्यापाठोपाठ आणखी दोन वाहनं येऊन धडकली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे . महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत .

खोपोली पोलीस आणि ‘अपघातग्रसतांच्या मदतीसाठी’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मदत कार्य सुरू केलं आहे . लॉकडाउनमुळे या मार्गावरची वर्दळ खूपच कमी झाली होती, त्यामुळे अपघातदेखील जवळपास थांबले होते . परंतु दुर्दैवाने आज हा अपघात झाला .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2020 8:29 am

Web Title: two killed on mumbai pune expressway msr 87
Next Stories
1 मनपाचे डॉ. बोरगे, शंकर मिसाळ, घाटविसावेंविरुद्ध गुन्हा
2 Coronavirus : नगर जिल्ह्यात करोनाचे चारशेहून अधिक रुग्ण
3 पतीला वाचविताना पत्नीचाही विहिरीत बुडून मृत्यू
Just Now!
X