News Flash

कंटेनर-मोटारीची धडक; दोन ठार, एक जखमी

शिरवळ लोणंद मार्गावर लोणी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला.

| May 20, 2015 03:30 am

कंटेनर-मोटारीची धडक; दोन ठार, एक जखमी

शिरवळ लोणंद मार्गावर लोणी गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर आणि मोटार गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. कंटेनर (एपी २९ टीए ८५२१) शिरवळहून लोणंदकडे जात होता. तर मोटारगाडी (एम एच १० बीएम ६३९१)लोणंदहून शिरवळकडे येत होती. हा अपघात लोणी गावच्या हद्दीत लोणी पुलाजवळ (ता. खंडाळा) घडला. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन्ही गाडय़ा समोरासमोर एकमेकावर आदळल्या. त्यात मोटारगाडीतील प्रशांत प्रमोद जंगम (वय २२, रा. ठाण बारामती सावळ पुणे), बालाजी रामेश्वर बारापल्ले (२६, रा. लातूर रोड, लातूर) हे जागीच ठार झाले व अमोल अर्जुन खैरमाटे (वय २९, रा. वंजारवाडी, सांगली) हे जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2015 3:30 am

Web Title: two killed one injured in container car accident
टॅग : Injured,Killed,Wai
Next Stories
1 भाजपचे २६ मे रोजी ‘जनकल्याण पर्व’
2 पोलिसांचा कारभार निष्पक्ष व पारदर्शी ठेवू
3 ‘नेपाळसदृश्य भूकंपाचा काश्मीर रेल्वेला धोका नाही’