News Flash

वाईमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाची तिघांना धडक, दोघांचा जागीच मृत्यू

जमावाची मद्यधुंद चालकाला मारहाण

राजुरा इथे हरिनाम सप्ताह सुरु आहे. या सप्ताहामध्ये जेवणानंतर काही मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला.

वाईतील बावधनमध्ये मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालकाने तिघांना धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर जमावाकडून मद्यधुंद चालकाला जमावाने मारहाण करत ट्रकची तोडफोड केली.

ट्रकने दिलेल्या धडकेत मानसिंग शंकर तरटे आणि पोपट रामचंद्र पिसाळ यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर जमावाकडून ट्रकचालक धनराज लक्ष्मण राजपुरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनास्थळी उशीर पोहोचल्याने जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 4:57 pm

Web Title: two killed one seriously injured in wai accident
Next Stories
1 रायगडमधील ‘श्रीमंत’ उमेदवार
2 राजू शेट्टी-खोत वादात कार्यकर्त्यांची कोंडी
3 सदाभाऊ खोत भाजपच्या व्यासपीठावर
Just Now!
X