सोलापुरात आज दोन पोलिस पत्नींनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत असलेले विनोद बंगाळे यांच्या पत्नी चारुशीला आणि सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील शिवप्पा बिराजदार यांच्या पत्नी विजयालक्ष्मी यांनी अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्या आहेत. कविता नगर पोलीस वसाहतीत विजयालक्ष्मी यांनी गळफास घेतला तर मुख्यालयातील पोलीस वसाहतीच्यामागे चारुशीला बंगाळे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. दोघींच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. एकाच दिवशी दोन पोलीस पत्नींनी आत्महत्या केल्याने पोलीस वसाहतीत खळबळ उडाली आहे.