वर्धा : कंपनीतील मजूरांची व्यवस्था करण्याऐवजी त्यांना गावी परत पाठविल्याबद्दल आर्वीच्या जिनींग पे्रसिंग कंपनीमालकास दोन लाख रूपयाचा दंड ठोठावण्यात आला असून देवळीच्या महालक्ष्मी प्रकल्पास दंड ठोठावतांनाच टाळे लावण्यात आले.  सेलू तालूक्यातील एका गावात काही मजूर गावाकड परत जाण्यास निघाले असल्याचे तपासणी पथकास निदर्शनास आले होते.

शनिवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्वत: तपासणी केल्यावर ही बाब खरी असल्याचे स्पष्ट झाले. हे मजूर आर्वीच्या बिपिन अग्रवाल यांच्या जिनींग पे्रसिंग असल्याचे निदर्शनास आले. आदेशानूसार मजूर आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था कंपनीला करणे अपरिहार्य आहे. आदेशाची पायमल्ली झाल्याचे दिसून आल्यावर अग्रवाल यांच्यावर करोना विषाणूचा प्रसार करण्यात हातभार लावत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत कंपनी मालकाचे म्हणने ऐकून न घेता त्याला दोन लाख रूपयाचा दंड ठोठावण्यात आला.

तसेच कंपनीने स्वत:ची वाहने पाठवून सेलूच्या तहसिलदाराशी संपर्क करावा व मजूरांना परत कंपनीत बोलावून त्यांची सर्व ती व्यवस्था करण्याचे निर्देश आहे. ही व्यवस्था न केल्यास कंपनी मालकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ईशारा आर्वी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी दिला आहे. तर दुसºया एका प्रकरणात देवळीच्या महालक्ष्मी पोलाद प्रकल्पात मजूर कार्यरत असल्याचे दिसून आल्यावर कंपनीला ३५ हजार रूपयाचा दंड करण्यात आला असून टाळे ठोकण्याची कारवाई वर्धा उपविभागीय अधिकाºयांनी आज केली.