News Flash

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील दोन लेन तीन तास बंद राहणार

तिसऱ्या लेनवरून वाहतूक संथ गतीने सुरू राहणार

संग्रहित

पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगदा येथे ‘स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम’ बसविण्यात येणार असल्याने, आज सकाळी ११ ते २ या तीन तासांसाठी पहिली आणि दुसरी लेन बंद ठेवण्यात येणार आहे. तर, तिसऱ्या लेनवरून वाहतूक संथ गतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहनं संथ गतीने धावणार आहेत. अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक, प्रादेशिक विभाग पुणे यांच्यावतीने यांच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना व प्रवाशांनी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर कि.मी. ७१ कामशेत बोगदा या ठिकाणी आज सकाळी ११ ते २ या वेळेत ‘स्पीड इन्फोर्समेंट सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय या कामामुळे द्रुतगती मार्गावरील या कालावधीत पहिली व दुसरी लेन बंद ठेवण्यात येणार असून, तिसऱ्या लेनवरून वाहतूक संथ गतीने सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे . दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्यास आवश्यकतेनुसार सर्व प्रकारची वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे पुलावरून जुना-मुंबई महामार्ग (NH-4) मार्गे मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत. ११ ते २ या वेळेत पुण्याकडून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी व प्रवाशांनी कामशेत बोगद्यादरम्यान कमी वेगाने वाहने चालवून महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 10:34 am

Web Title: two lanes on pune mumbai expressway will be closed for three hours msr 87
Next Stories
1 अजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा गटनेता कोण?; विधानसभा सचिव म्हणतात…
2 “अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सिंचन घोटाळ्यातील फाईल बंद होणं म्हणजे…”- एकनाथ खडसे
3 आमच्याकडे काल १६२ होते, बहुमत चाचणीवेळी १७० असतील – संजय राऊत
Just Now!
X