News Flash

सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोघांना अटक

पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा संशयितांना अटक झाली असून दोन जण

| July 2, 2013 02:04 am

पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात आणखी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा संशयितांना अटक झाली असून दोन जण अद्याप फरार आहेत. पिंपळगाव बसवंत येथील १७ वर्षीय युवतीला गावातील रोहित ऊर्फ किरण पाटील या तिच्या मित्राने दुचाकीवरून नाशिकला नेले. पंचवटीतील टकलेनगर येथील उमिया आशीष अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये रोहितच्या मित्रांनी सलग तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी उमेश चव्हाण (रा. देवगाव, ता. निफाड), केतन सोनवणे, सागर आवारे (रा. पिंपळगाव), बंटी पानकर, जय सोनवणे, अमोल वराडे (रा. नाशिक) आणि नितीन चव्हाण यांच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी किरण पाटील, उमेश चव्हाण, केतन सोनवणे व सागर आवारे यांना शनिवारीच अटक केली होती. त्यांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी या प्रकरणातील बंटी ऊर्फ महेंद्र विनायक पानकर (३०, टकलेनगर, पंचवटी) आणि नितीन मोहन चव्हाण (२५, मालाड, मुंबई) या दोन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील अद्याप दोन संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 2:04 am

Web Title: two more arrested in nashik gang rape case
Next Stories
1 ‘कॉंग्रेसविरोधी भावनेच्या आधारावर राज्यातील आघाडी सरकार उलथवू’
2 तीनशे आदिवासी विद्यार्थी नामांकित शाळांच्या प्रतीक्षेत
3 कापूस हमीभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; अल्प वाढीने कास्तकारांमध्ये असंतोष
Just Now!
X