10 August 2020

News Flash

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी दोघे करोनाबाधित; 4 संदिग्ध अहवाल प्रतिक्षेत

शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 29

संग्रहित छायाचित्र

उस्मानाबाद  करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून शनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. उमरगा तालुक्यातील कोथळी येथील 22 वर्षीय तरुण तर कळंब तालुक्यातील शिराढोण येथील 33 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाचा विळखा आता चांगलाच वाढू लागल्याचे दिसत आहे. दरम्यान शुक्रवारी कळंब तालुक्यातील पाथर्डीच्या महिलेचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे तिचे फुलांचा वर्षाव करुन अभिनंदन केले. तिचा तिसरा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 41 जणांचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहेत. यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर एकाचा अहवाल रद्द झाला असून 4 प्रलंबित आहेत. उर्वरित 34 अहवाल निगेटिव्ह आल्याचा दिलासा मिळाला आहे. उमरगा तालुक्यातील कोथळी येथील तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तर कळंब तालुका आता कोरोना हॉटस्पॉट ठरु लागला आहे.

शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोनाबाधितांची संख्या 29 पर्यंत गेली असून पाच जणांना करोनामुक्त झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. 11 मे पासून करोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असून आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 11:25 pm

Web Title: two more corona affected in osmanabad district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोलापुरात ४९ नवे रूग्णांची भर; सहाजणांचा मृत्यू; रूग्णसंख्या ५६५ वर
2 Coronavirus : महात्मा फुले जन-आरोग्य योजनेंतर्गत आता सर्वांना उपचार!
3 महाराष्ट्रात २६०८ नवे करोनारुग्ण, ६० मृत्यू, संख्या ४७ हजारांच्याही पुढे
Just Now!
X