01 June 2020

News Flash

मुंबईहून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेले दोन जण करोनाबाधित

जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 वर पोहचली

मुंबईत करोनाचा उद्रेक झालेल्या धारावीच्या झोपडपट्टीतून आलेला एक जण आणि मुंबईतील खासगी रुग्णालयातून चंद्रपुरात दाखल झालेल्या एक जण अशा दोघांनाही करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  आज (शनिवार) 23 मे रोजी दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असता ते करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 झाली आहे.

दरम्यान मुंबई, पुणे व इतर ठिकाणाहून येणाऱ्यांमुळे जिल्ह्यात करोना बधितांची संख्येत भर पडत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार आज दुपारी बल्लारपूर येथील ३७ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील एकजण मुंबईतील धारावी वस्तीमधून 20 मे रोजी बल्लारपूरमध्ये पोहचला होता. या व्यक्तीचे तो आला त्याच दिवसापासून संस्थात्मक अलगीकरण ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) करण्यात आले होते. 22 मे रोजी सकाळी त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. आज  त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रुग्णासोबतच जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्णाची संख्या 14 झाली आहे.

आणखी वाचा- सोलापुरात ३२ नव्या करोनाबाधितांची नोंद; एकूण रुग्णसंख्या ५४८ वर

तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील एक युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती  परिचारिका म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती.१६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली.तेव्हापासून ती होम क्वारंटाइन होती. दरम्यान तिच्यात करोनाची लक्षणे जाणवायला लागल्यावर  ती 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.या युवतीच्या घरातील आई-वडील व बहीण या तिघांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात 23 नवे करोनाबाधित, एकूण रुग्ण संख्या 1 हजार 241 वर

पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 14 झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज  मिळालेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 5:00 pm

Web Title: two more corona positive in chandrapur district msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 भाजपाची कृती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच : सचिन सावंत
2 मनसेत परतल्यानंतर तीन महिन्यात राजकीय संन्यास, हर्षवर्धन जाधवांचा असा आहे प्रवास
3 मुंबईतले ठाकरे काही करु शकले नाही, नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार??
Just Now!
X