News Flash

सोलापुरात करोनाचे आणखी दोन बळी; रुग्णसंख्या २७७

मृतांची संख्या १९ वर

संग्रहित छायाचित्र

सोलापुरात मंगळवारी वैद्यकीय यंत्रणेतील दोघा कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले, तर दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णसंख्या २७७ झाली असून मृतांची संख्या १९ वर पोहोचली आहे.

शहरातील रविवार पेठेत राहणाऱ्या ५२ वर्षांच्या एका महिलेला करोनाबाधा झाल्यामुळे तिच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच मोदीखान्यातील शिवाजीनगरात राहणाऱ्या एका ७१ वर्षांच्या वृध्दालाही करोनाची बाधा झाल्याने रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असताना या दोघांचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे करोनाने घेतलेल्या बळींची संख्या १९ झाली आहे. यात १० पुरुष आणि ९ महिला आहेत.

होटगी रस्त्यावर आसरा सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेला करोनाची बाधा झाली आहे. तसेच शिक्षक सोसायटीतीलही एका महिलेला करोनाबाधा झाली आहे. यातील एक महिला परिचारिका आहे, तर दुसरी महिला फार्मासिस्ट असल्याचे सांगण्यात आले. गेल्या १२ एप्रिल रोजी सोलापुरात करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर महिनाभरात रुग्णसंख्या वाढून २७७ वर पोहोचली आहे. यात १५८ पुरुष तर ११९ महिलांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:10 am

Web Title: two more victims of corona in solapur abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लुपिन फाउंडेशनतर्फे महापालिकेला पाच थर्मल स्कॅनिंग यंत्रे
2 सांगलीत ९४ वर्षांच्या आजीची करोनावर मात
3 सातारा जिल्ह्य़ात तिघांना करोनाची बाधा
Just Now!
X