निसर्ग चक्रीवादळाचा अंदाज लक्षात घेऊन पालघरमध्ये NDRF ची दोन पथकं पालघरमध्ये तैना तैनात करण्यात आली आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अर्थात एनडीआरएफच्या ९ टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. ज्यापैकी तीन टीम्स मुंबईतीही तैनात करण्यात आल्या आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

निसर्ग या चक्रीवादळाची तीव्रता पुढील ४८ तासांमध्ये वाढू शकते. वायव्य दिशेकडे वाटचाल करत हे वादळ ३ जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल असा अंदाज हवामाव विभागाने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर २ ते ४ जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणातल्या काही भागांमध्येही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.