25 February 2021

News Flash

वाशिम जिल्ह्यात करोनाचे आणखी दोन रुग्ण

६० नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : वाशिम जिल्ह्यात आणखी दोन जणांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १३ झाली. वाशिम जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या १९ अहवालांपैकी दोन अहवाल सकारात्मक, तर १७ अहवाल नकारात्मक आले. वाशिम तालुक्यातील बोराळा हिस्से येथील १५ वर्षीय युवतीला करोनाची लागण झाली आहे. ती करोनाबाधिताच्या नजीकच्या संपर्कातील आहे. मुंबई येथून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आलेल्या कुटुंबातील एका आठ वर्षीय बालकाचा अहवालही सकारात्मक आला आहे. त्याच्या वडिलांचा अहवाल कालच नकारात्मक आला होता, तर आईचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

मुंबई येथून पोहरादेवी येथे आल्यानंतर या कुटुंबाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. पोहरादेवी येथे येण्यापूर्वी हे कुटुंब नांदेड जिल्ह्याातील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दरम्यान, जिल्ह्यातील आतापर्यंत ४३९ नमुने तपासणी पाठविण्यात आले. त्यापैकी ५३ नमुने आज पाठवले. आतापर्यंत १३ अहवाल सकारात्मक आले असून, त्यातील दोघांचा मृत्यू, तर सहा जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली. पाच जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३६६ अहवाल नकारात्मक आले असून, ६० नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 8:01 pm

Web Title: two new corona cases in washim district scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘निसर्ग’ वादळाने उद्ध्वस्त घरांच्या दुरुस्तीसाठी शासनाने रोख मदत करावी : पवार
2 बुलडाण्यात दोन नवे करोना रुग्ण, आठ जणांना डिस्चार्ज
3 अकोल्यात करोनामुळे आणखी एक मृत्यू, ४३ नवे रुग्ण
Just Now!
X