05 August 2020

News Flash

दोन नवे पालकमंत्री जाहीर; कोल्हापूरची जबाबदारी सतेज पाटलांकडे

महाविकास आघाडीच्या सरकारकडून दोन नव्या पालकमंत्र्यांची बुधवारी घोषणा करण्यात आली.

(संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीच्या सरकारकडून दोन नव्या पालकमंत्र्यांची बुधवारी घोषणा करण्यात आली. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद सतेज पाटलांकडे तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी पहिल्या यादीत शिवसेनेकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ तर काँग्रेसकडे ११ पालकमंत्रीपदं आली होती.

दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, ते स्विकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री असलेले काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. मात्र, यामध्ये अखेर सतेज पाटलांनी बाजी मारली.

सतेज पाटील यांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री होणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्याला मुश्रीफ समर्थकांनी उत्तर देत आपला पालकमंत्री पदावर हक्क सांगितला होता. मात्र, सुरुवातीला प्रत्यक्षात पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले तेव्हा त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मुश्रीफ यांच्याकडे सातारा जिल्ह्याचे तर सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची  जबाबदारी दिल्याने दोघांपासूनही कोल्हापूरचे पालकमंत्रिपद दूर राहिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 5:15 pm

Web Title: two new guardian ministers announced kolhapurs responsibility upon satej patil aau 85
Next Stories
1  ‘गोकुळ’चा वीज, पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश
2 भाजप कोल्हापूर शहराध्यक्षपदी चिकोडे; जिल्हाध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे
3 कोल्हापूरचे अ‍ॅड. अमित बोरकर उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश
Just Now!
X