22 October 2020

News Flash

पुण्यात लॉक अपमध्ये असलेल्या दोन कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील स्वच्छतागृहात स्वत:वर धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रतीकात्मक छायाचित्र

घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमधील स्वच्छता गृहात स्वत:वर धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोरखसिंग गागासिंग टाक (वय-२७) आणि तिलकसिंग गब्बरसिंग टाक (वय-२३) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात गोरखसिंग गागासिंग टाक आणि तिलकसिंग गब्बरसिंग टाक यांना केली होती. या दोघांना अटक करुन रात्री दोनच्या सुमारास विश्रामबाग पोलीस ठाण्यातील लॉक अपमध्ये ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास या दोन्ही आरोपीनी लॉक अपमधील स्वच्छतागृहात धारदार वस्तूने हात, पाय आणि गळ्यावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती देण्यात आली.या घटनेचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 5:12 pm

Web Title: two prisoners attempt suicide in the vishrambaug police stations washroom in pune
Next Stories
1 अब्रू वाचवण्यासाठी घराच्या गॅलरीतून मारली उडी, मुंबईनंतर पुण्यातील धक्कादायक घटना
2 शिवसेनेने सायनचा गड राखला, पोटनिवडणुकीत रामदास कांबळे विजयी
3 पुणे महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने गड राखला, पूजा कोद्रे विजयी
Just Now!
X