सांगलीमधील ताडसर आणि वांगी या दोन छोट्या गावांमधील दोन वयस्कर शेतकऱ्यांची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे या दोघांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं आहे. इतकच नाही तर त्यांनी हा माल थेट दुबईला निर्यात केलाय. विशेष म्हणजे अशाप्रकारे भारतातून एखाद्या शेतकऱ्याने परदेशामध्ये ड्रॅगन फ्रूट पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारतामध्ये उत्पादन घेतलं जाणारं गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटचं या दोघांनी उत्पादन घेतलं असून १०० किलो माल त्यांनी दुबईला पाठवल्यांचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या दोघांनाही आपल्या शेतांमध्ये घेतलेल्या उत्पादानापैकी प्रत्येकी ५० किलोचा माल दुबईला पाठवला आहे. हे फळ कमळाच्या फुलासारखं दिसत असल्याने त्याला कमलम असंही म्हटलं जातं. सांगलीसारख्या दुष्काळग्रस्त भागातील १५० एकरावर ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जात आहे. या फळाला चांगली मागणी असून या पिकाच्या आधारे येथील शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. सांगली जिल्ह्यामधील कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात द्राक्षं आणि ऊसाचं उत्पादन घेण्याऐवजी आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटचं पिक घेताना दिसत आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
udyog bhavan marathi news, udyog bhavan loksatta marathi news
‘उद्योग भवना’ची नऊ वर्षांनंतरही प्रतीक्षाच! विकासकाच्या इमारती मात्र विक्रीसाठी सज्ज, ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ पद्धतीत विकासक फायद्यात
Panvel, sheva village, Air Force Station, Suspicious Individual, Arrests, Trespassing, Roaming, Restricted Area, marathi news
हवाई दलाच्या प्रवेश निषिद्ध परिसरात प्रवेश केल्याने गुन्हा दाखल

नक्की वाचा > गजा गेला… ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेतलेल्या सांगलीमधील बैलाचं निधन

७८ वर्षीय आनंदराव पवार यांनी खेडगाव तहसीलमधील आपल्या ताडसर या गावी सहा वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर ड्रॅगन फ्रूटचं पिकं घेतलं. हे गाव समुद्रसपाटीपासून ५०० मीटर उंचीवर आहे. “मी ऊसाऐवजी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आमचं शेत उंचावर आहे. सहा वर्षापूर्वी मला साताऱ्यामधील एका शेतकऱ्याकडून ड्रॅगन फ्रूटच्या पिकाची माहिती मिळालेली. या पिकाला कमी पाणी लागतं. मी सेंद्रीय खतं वापरलं. त्याचा फायदा झाला. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून फळाचा आकार आणि चव अगदी हवी तशी आणि दर्जेदार निघाली. माझ्या शेतामधील ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची मोठ्या आकाराची फळं दुबईला पाठवली आहे,” असं पवार सांगतात.

पवार यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहून वांगी गावातील राजाराम देशमुख यांनीही ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेण्याचं ठरवलं. दीड एकरामध्ये राजाराम यांनी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं. पुढील वर्षी ते पाच एकरामध्ये उत्पादन घेणार असल्याचं सांगतात.

सांगली जिल्ह्याचे कृषी निरिक्षक बसवराज मास्तोली यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच प्रमाण वाढलं आहे. कोरड्या ठिकाणी या फळाचं उत्पादन घेतलं जातं. प्रामुख्याने आटपाडी, जत आणि खेडेगावमध्ये हे उथ्पादन घेतलं जाते. जास्त पाणी लागणाऱ्या ऊसारख्या पिकापेक्षा आणि अधिक खर्च असणाऱ्या द्राक्षाच्या पिकापेक्षा या पिकाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. यामधून शेतकऱ्यांना मोठा नफा देखील मिळत असल्याचं बसवराज सांगतात.