News Flash

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन ‘एसआयटी’: राज्य सरकार

मार्चमध्ये झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले होते

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंचन घोटाळ्याप्रकरणी विदर्भात नागपूर आणि अमरावती अशा दोन ठिकाणी विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टात देण्यात आली.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने या प्रकरणात महत्त्वाची माहिती हायकोर्टात देण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन एसआयटीमार्फत तपास केला जाईल, अशी माहिती दिली. यासाठी नागपूर आणि अमरावती अशा दोन ठिकाणी एसआयटीची स्थापना केल्याचे राज्य सरकारने हायकोर्टात सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात मार्चमध्ये झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले होते. सिंचन घोटाळ्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अतिशय संथपणे तपास सुरु आहे. याबाबतीत सरकार गंभीर नाही. झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, अशी शब्दात हायकोर्टाने फटकारले होते. या संदर्भात एसआयटीची स्थापना करावी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने एसआयटीची स्थापना केल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2018 4:00 pm

Web Title: two sit formed for investigation of irrigation scam maharashtra government in mumbai high court
Next Stories
1 ‘त्या’ चिमुकल्याचा गाडीत गुदमरून मृत्यू की हत्या? वडिलांनी व्यक्त केला संशय
2 ‘बाबांनो हेच ते अच्छे दिन’! पेट्रोल दरवाढीवर राज ठाकरेंनी ‘पेटवली काडी’
3 अंगावर पत्नीचे फोटो चिटकवून पतीची आत्महत्या, पिंपरी-चिंचवडमधील घटना
Just Now!
X