डीएनए चाचणीनंतर निष्कर्षांवर शिक्कामोर्तब

नागपूर : भारतातील तरुण संशोधकांनी आंध्र आणि कनार्टक या दोन राज्यातून सरडय़ांच्या दोन नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. २०१३ मध्ये या प्रजाती संशोधकांना आढळल्या, पण या प्रजाती नवीन आणि वेगळ्या आहेत का हे तपासण्यासाठी त्यांना तब्बल चार-साडेचार वर्षे लागली. ‘सिटाना गोकाकेन्सिस’ आणि ‘सिटाना भोंडलू’ अशी नावे त्यांना देण्यात आली आहेत.

Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

सरीसृप क्षेत्रात संशोधक आणि संशोधनाची वानवा आहे. अलीकडच्या काही वर्षांत मात्र यात बदल होत आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातूनही या क्षेत्रात संशोधकांची नवी फळी तयार होत आहे. वरद गिरी यांच्या पाठोपाठ अक्षय खांडेकर यांचेही नाव या फळीत जुळले आहे. २०१५ मध्ये दीपक विरप्पन यांना ‘सिटाना कोकाकेन्सिस’हा सरडा सापडला. तो भारतात फक्त गोकाक याठिकाणीच आढळतो.  तर २०१६ मध्ये ‘सिटाना भोंडलू’ हा सरडा सापडला. या दोन नवीन जातीच्या सरडय़ांवर २०१६ ते २०१८ या कालावधीत दीपक विरप्पन(तामीळनाडू), आर. चैतन्य(तामीळनाडू), प्रवीण कारंथ(कर्नाटक), अक्षय खांडेकर(महाराष्ट्र) यांनी प्रयोगशाळेत बसून या प्रजाती किती, त्यात कोणत्या नव्या आहेत हे सर्व शास्त्रीय पद्धतीने शोधून काढले. यातील एक प्रजाती कर्नाटकातील गोकाक येथून शोधलेली आहे. गोकाक धबधब्याजवळ ती आढळली तर दुसरी प्रजाती ही आंध्रप्रदेशातील नागार्जून सागरजवळ आढळली. त्या नवीन आहेत किंवा नाही हे संशोधकांना माहिती नव्हते. त्यामुळे या चौघांचेही नमुने घेऊन त्याची डीएनए चाचणी व इतर चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर या प्रजाती सरडय़ांच्या इतर प्रजातीपेक्षा खूप वेगळ्या असल्याचे जाणवले. रंग तसेच शरीरावरचे आकार आणि इतर बाबी वेगळ्या आढळल्यानंतरच त्यांना नवीन प्रजाती म्हणून घोषित करण्यात आले. गोकाक येथे एक प्रजाती आढळल्याने त्या जागेवरून ‘सिटाना गोकेन्सिस’ असे त्याला नाव देण्यात आले, तर तेलगूमध्ये सरडय़ाला भोंडुलू असे म्हणतात. त्यामुळे दुसऱ्या प्रजातीला ‘सिटना भोंडुलू’ असे नाव देण्यात आले. स्थानिक लोकांनाही सरीसृप जगात काय चालले आहे आणि त्यांच्या परिसरात काय आढळते हे कळायला हवे. त्यामुळेच नव्या प्रजातीला अशा पद्धतीची नावे दिली जातात.

‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’

या दोन्ही जातीच्या नरांना गळ्यावर ‘फॅन’ असतो. म्हणून त्याला इंग्रजीत ‘फॅन थ्रोटेड लिझार्ड’ असे म्हणतात. याचा उपयोग ते माद्यांना आकर्षित करण्यासाठी करतात. हे दोन्ही सरडे घनदाट जंगलात न आढळता फक्त खुरटय़ा झुडुपांच्या खडकाळ माळरानावर आढळतात. या दोन्ही प्रजातींचा प्रजननकाळ मार्च ते जून या महिन्यात असतो.

सिटाना प्रजाती महाराष्ट्रात सातारा, पुणे येथे सापडते. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात ही जात सापडत नाही. आंध्र आणि कर्नाटकातील प्रजाती वेगळी आहे. जून २०१८ मध्ये ‘झू-टाक्सा’या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये याचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला, असे अक्षय खांडेकर याने सांगितले.