01 March 2021

News Flash

पुणे-बंगळुरु महामार्गावर दोन एसटी बसच्या अपघातात नऊ जखमी

बंद पडलेल्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिली.

पुणे-बंगळुरु महामार्गावर शिवराजनगर(काशीळ,ता.सातारा) येथे बंद पडलेल्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले. गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.या अपघाताची फिर्याद प्रकाश तुकाराम डिसले (सांगली आगार बसचालक,रा.वसगडे, ता.पलूस,जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची सातारा ते सांगली जाणारी बस गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास महामार्गावर शिवराजनगर (काशीळ) येथे बंद पडल्याने चालकाने बस महामार्गालगत बाजूला उभी केली होती.या नादुरुस्त बसला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिली.

या अपघातात स्वारगेट- कोल्हापूर बसचा वाहक दगडू वसंत मुगदल (वय.५२,रा.वडनगे,ता.करवीर.जि. कोल्हापूर) यांच्यासह त्यातील प्रवाशी शुभम दगडू मुगदल (वय.२०), वैशाली दगडू मुगदल (वय.४४,दोघे रा.वडगणे, ता.करवीर,जि. कोल्हापूर),संदीप कागले (वय.४८),तुषार संतोष कागले (वय.२१) कोमल संतोष कागले (वय.२३)शारदा संतोष कागले (वय.४७),आदित्य संतोष कागले (वय १७,सर्व रा.सेवाधाननगर चिथोड,जि. धुळे),संगीता संतोष पोतदार (वय.३८,रा.मलकापूर,कराड) हे गंभीर व किरकोळ जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच सहायक निरीक्षक डॉ.सागर वाघ,हवालदार सुनील जाधव,मनोहर सुर्वे,किरण निकम यानी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी कराड येथे पाठवले.

अपघाताची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून स्वारगेट- कोल्हापूर बसचालक अजित मारुती पाटील (रा.तीटवे,राधानगरी,कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 8:31 pm

Web Title: two st bus collided on pune banglore highway dmp 82
Next Stories
1 कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर ५ टक्के कॅशबॅक
2 दिलासादायक : महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू राहणार
3 साताऱ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; पिकांचे, फळबागांचे नुकसान
Just Now!
X