07 March 2021

News Flash

नागपुरात ट्रक चालकाला छताला लटकवून बेदम मारहाण

चालकाला मारहाण करणाऱ्या दोघांनाही अटक

गोदामातला माल संबंधित स्थळी न पोहचविता त्या कामासाठी दिलेली आगाऊ रक्कम परस्पर खर्च करणाऱ्या ट्रक चालकाला मालकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चालकाला छताला लटकवून दोघांनी मारहाण केली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याची दखल पोलिसांनी घेतली आणि युवासेनेचा तालुका प्रमुख अखिल पोहनकर आणि त्याचा साथीदार अमित ठाकरे या दोघांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवासेना तालुका प्रमुख अखिल पोहनकरच्या टक्रवर विकी सुनील आगलावे हा चालक म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून काम करतो. आठवड्याभरापूर्वी वाडी येथील गोदामातून त्रिवेंद्रम येथील ट्रकमध्ये भरला होता. अॅडव्हान्स म्हणून ३० हजार रुपये आणि डिझेल भरण्यासाठी ३ हजार असे ३३ हजार रुपये चालक विकीला अखिल पोहनकरने दिले. चालक विकीने हा ट्रक त्रिवेंद्रमला न नेता अन्य ठिकाणी नेऊन ठेवला. तसेच मालकाने अॅडव्हान्स म्हणून दिलेले पैसेही खर्च केले. याबाबत पोहनकरला कळताच त्याने चालकाचा शोध घेतला. शनिवारी विकी त्यांना सापडला. ज्यानंतर विकीला त्याने आपल्या एका साथीदारासह वडधमना येथील वाहतूक कार्यालयात नेले. तिथे त्याला छताला लटकवून बेदम मारहाण करण्यात आली.

मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि या दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणातल्या इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 3:59 pm

Web Title: two transporters akhil pohankar amit thakre have been arrested for allegedly assaulting a driver employed by pohankar scj 81
Next Stories
1 चौकशी सुरू असणाऱ्यांना भाजपप्रवेश नाही : मुख्यमंत्री
2 स्वतःवर गोळी झाडून घेत SRPF जवानाची आत्महत्या
3 पाच वर्षांत एक कोटीहून अधिक झाडांची कत्तल
Just Now!
X