News Flash

गडचिरोलीत नक्षल्यांकडून दोन आदिवासींची गोळ्या घालून हत्या

कामथळा जंगल परिसरात ही घटना घडली

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दोन आदिवासी नागरिकांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याचा प्रकार सोमवारी घडला. मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कामथळा जंगल परिसरात ही घटना घडली. मतकुरशाह होळी (रा. कामथळा) आणि गंगसू कुमुटी (रा. हुरयादंड) अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांचे मृतदेह गावकऱ्यांना मिळाले आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जंगलामध्ये नक्षल्यांनी गोळ्या घालून या दोघांची हत्या केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:43 pm

Web Title: two tribals killed by maoist in gadchiroli district
Next Stories
1 …तर विदर्भ आंदोलनाला हिंसक वळण लागेल- श्रीहरी अणे
2 शस्त्रक्रियेनंतर बीडमध्ये पाच जणांची दृष्टी अधू
3 कृष्णा-कोयनेचा पाणीउपसा आणि पाणीउपसा बंदीचा कालावधी जाहीर
Just Now!
X