News Flash

फिरायला गेलेल्या ४ महिलांना मालमोटारीने चिरडले, दोघी ठार

सकाळी पाथर्डी रस्त्यावर फिरायला गेलेल्या शिरूर येथील चार महिलांना भरधाव मालमोटारीने चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला, तर अन्य दोघी गंभीर जखमी आहेत. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर

| May 24, 2014 03:25 am

सकाळी पाथर्डी रस्त्यावर फिरायला गेलेल्या शिरूर येथील चार महिलांना भरधाव मालमोटारीने चिरडले. यात दोघींचा मृत्यू झाला, तर अन्य दोघी गंभीर जखमी आहेत. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मालमोटारीसह चालक पसार झाला.
शिरूर कासार येथील नागरिक पहाटेच्या सुमारास पाथर्डी रस्त्यावर फिरायला जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे चार महिला फिरत असताना साडेपाचच्या सुमारास भरधाव मालमोटारीने महिलांना चिरडले. चालक गाडी न थांबवता वेगात निघून गेला. कविता बबन तळेकर (वय २३) यांचा जागीच, तर काशिबाई छत्रपती नन्नवरे (वय ४५) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. संगीता िझझुर्डे (वय ३५) व अन्य एक महिला जखमी झाली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. फरारी चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:25 am

Web Title: two women died in road accident 2
Next Stories
1 मीरासाहेबांच्या उरुसास मिरजेत प्रारंभ
2 पारधी समाजाचा आंदोलनाचा इशारा
3 पारधी समाजाचा आंदोलनाचा इशारा
Just Now!
X