News Flash

वाघाच्या हल्ल्यात दोन महिला ठार; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण!

गडचिरोलीमधील महादवाडी व कुराडी या जंगल परिसरातील घटना

प्रातिनिधिक छायाचित्र

गडचिरोलीतील महादवाडी व कुराडी जंगलात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या दोन महिला ठार झाल्या. दोन्ही घटना आज सोमवारी सकाळच्या आहेत. या घटनेमुळे भीती व दहशतीचे वातावरण आहे.

मे महिन्याच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात तेंदुपत्ता तोडायचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील स्थानिक मोठ्या प्रमाणावर तेंदूपत्ता तोडण्याच्या कामी जंगलात सकाळपासूनच जात आहेत. आज सोमवारी पोर्ला वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महादवाडी व कुराडी या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक तेंदूपत्ता सोडण्याकरिता गेले होते. यात पहिली घटना महादवाडी जंगलात सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. महादवाडी येथील कल्पना दिलीप चौधरी (३७)ही महिला सहकाऱ्यांसमवेत तेंदूपत्ता तोडण्याचे कामात मग्न असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात कल्पना जागीच मरण पावली. वाघाचा हल्ला होताच तिने किंकाळी फोडली, लगेच आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे वाघ तिथून पळून गेला. दुसरी घटना महादवाडीपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर कुराडी गावालगतच्या जंगलात सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान घडली यात सिंधुबाई दिवाकर मुनघाटे (५६)या महिलेचा मृत्यू झाला.

हल्ला करणारे दोन्ही वाघ दीड ते दोन वर्षे वयाचे होते. घटनेची माहिती मिळताच पोला वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी पाठविले असून, मृतकांच्या कुटुंबीयांना तत्काळ दहा हजार रुपये सानुग्रह सहाय्यता केली आहे. नियमानुसार वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे कळते. दरम्यान वनविभागाने गडचिरोली परिसरात वाघांचा वावर असल्याचे सांगत नागरिकांनी जंगलात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 5:20 pm

Web Title: two women killed in tiger attack an atmosphere of terror among the citizens msr 87
Next Stories
1 फडणवीसांना पंतप्रधानांबरोबरच नीती आयोगाकडूनही अगदी घरचा मोठा आहेर – सचिन सावंत
2 “तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”; काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ
3 अपेक्षा आहे राजकारण करणारे गडकरींचा सल्ला मानतील – रोहित पवार
Just Now!
X