एसटीला ओव्हरटेक करणा-या मारुती व्हॅनने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन  तरुण ठार झाल्याची घटना कराडनजीक आगाशिवनगर येथे कराड-ढेबेवाडी मार्गावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. प्रल्हाद बजरंग गुंजावले (वय २४) व नीलेश सुरेश खोत (वय २४, दोघेही रा. घारेवाडी, ता. कराड) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. मारुती व्हॅन (क्र. एमएच ११, वाय ४९५८) एसटीला ओव्हरटेक करीत असताना ती मोटारसायकलला (क्र. एमएच ५० ई ४१८८) जोराची धडकल्याने हा अपघात झाल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत.