News Flash

अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे यांची भेट; प्राजक्ता गायकवाडशीही केली चर्चा

वादाचं नेमकं कारण काय?

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं केलेल्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद चर्चेत असून, मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली.

साताऱ्यात ‘माझी आई काळुबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या सुरु असून निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यामधील झालेला वाद चांगलाच चर्चेत आला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने ही मालिका अर्ध्यातूनच सोडल्याचं समोर आलं. त्यानंतर अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक चकमक झडली.

या संपूर्ण प्रकरणात अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनं अलका कुबल यांना दिलं. त्याचबरोबर प्राजक्ता गायकडवाड हिच्याशीही फोनवरून चर्चा करत वाद मिटवण्याचं सूचना केली. या भेटीची माहिती उदयनराजे यांनी ट्विट करून दिली.

“जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आज भेट घेतली. काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली,” असं उदयनराजे म्हणाले.

वादाचं नेमकं कारण काय?

‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात सुरु होते. मात्र, मागच्या महिन्यात या सेटवर काही लोकांना करोनाची लागण झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी गावात चित्रीकरण करण्यास नकार दिला. त्यामुळे पुढील चित्रीकरण मुंबईत करण्यात यावे, असं ठरलं होतं. सगळे क्रू-मेंबर मुंबईला परतले. विवेक आणि प्राजक्ताला एकाच गाडीनं परतायचं होतं. मात्र, विवेकला उशीर झाल्यानं प्राजक्तानं कारण विचारलं. त्याने आपण कोव्हिड रुग्णांना दाखल करून येत असल्याचं सांगितल्यावर ती थोडी घाबरली. मात्र हे बोलून दाखवल्यावर विवेकनं मला शिवीगाळ करत, माझ्या आईबद्दल अपशब्द उच्चारले”, असा आरोप प्राजक्तानं केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 9:11 am

Web Title: udayan raje bhosale prajakta gaikwadalka kubal aai majhi kalubai bmh 90
Next Stories
1 Video : ओम फट स्वाहा, ‘झपाटलेला’ पाहताना चिमुकल्या जिजाचा व्हिडीओ व्हायरल
2 ‘ट्विंकल बॉम्ब’, स्वत:चे मीम शेअर करत ट्विंकल म्हणाली..
3 ‘रामायण’ मालिकेतील ‘रावण’ झाले ८२ वर्षांचे; कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
Just Now!
X