02 December 2020

News Flash

काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्व समजून घ्यावं; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

दसरा मेळाव्यातून साधला निशाणा

"शिवसेनेसह महाराष्ट्रात, विष्णोई यांच्यासह हरयाणात व आता नितीशकुमार यांच्यासह बिहारमध्ये हाच पाठीत वार करण्याचा डाव खेळत आहेत. दहीहंडी फोडताना पाया मजबूत हवा नाही तर पाया ढासळतो आणि वरचा माणूस दोरीला लटकतो. आधी शिवसेना, मग अकाली व आता इतर काही जण रालोआ व भाजपमधून बाहेर पडत आहेत. पाया ढासळत आहे."

मंदिरं खुली करण्यावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदुत्वावरून डिवचलं होतं. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी उत्तर दिलं होतं. त्यानंतर दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत टोला लगावला. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. यंदा करोनाच्या सावटामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून हा सोहळा आयोजित करण्यात आला. यंदा हा सोहळा स्वातंत्र्यावीर सावरकर सभागृहात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

“हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात, का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते. घंटा बडवा, थाळ्या बडवा, हे तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे. सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या. संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे. काळी टोपी घालणाऱ्यांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावं,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

नारायण राणेंची तुलना बेडकाशी…

“प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 7:36 pm

Web Title: uddhav thackeray bhagat singh koshyari maharashtra cm shivsena dasara melava bmh 90
Next Stories
1 सरकार पाडण्यासाठी मुंबईत दोनशे कोटी पाठवले होते; दसरा मेळाव्यात राऊतांचा गौप्यस्फोट
2 एक बेडूक आणि त्याची दोन पोरं; उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंवर हल्ला
3 पंकजा मुंडेंनी पक्षांतराच्या चर्चांना एका वाक्यात दिला पूर्णविराम; म्हणाल्या…
Just Now!
X