News Flash

उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद : मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले १९७ कोटी रुपये

करोनाविरोधातील लढ्याला समाजातून पाठबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात निधीचा ओघ सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी लाखो रुपयांचं योगदान यासाठी दिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

या निधीत ८३ वेगवेगळ्या दानशूर घटकांनी प्रत्येकी २५ लाखांहून अधिक रकमेचे योगदान दिल्याने निधीत १७० कोटी रुपये जमा झाले आहेत. गत दोन दिवसांत ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे.

या शिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्या परीने हातभार लावणे सुरू केले आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19
मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 6:07 pm

Web Title: uddhav thackeray cm corona fund maharashtra get huge responce pkd 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 लांडोरीची शिकार केल्याप्रकरणी साताऱ्यातून दोघे अटकेत
2 …तर तुमचा कणखरपणा दिसला असता, राजू शेट्टींची उद्धव ठाकरेंवर टीका
3 CoronaVirus : वर्धा जिल्ह्यात प्रवेशाअगोदर चेक पोस्टवरच वाहनांचे निर्जंतुकीकरण
Just Now!
X