News Flash

‘पैसे जास्त झाल्यानेच भाजपला मध्यावधीचे डोहाळे’

कर्जमुक्तीची अंमलबजावणी न झाल्यास राजकीय भूकंपाचा इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( संग्रहीत छायाचित्र )

उद्धव ठाकरेंचा टोला; कर्जमुक्तीची अंमलबजावणी न झाल्यास राजकीय भूकंपाचा इशारा 

‘केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडे पसे जास्त झाल्याने त्यांच्याकडून मध्यावधीची भाषा सातत्याने बोलली जात आहे. भाजपकडे जास्तच पसा झाला असेल तर, त्यांनी तो शेतकऱ्यांना द्यावा’, असा सल्ला देऊन शेतकरी कर्जाचा विषय बाजूला ठेवण्यासाठीच भाजपला मध्यावधीचे डोहाळे लागले आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला.

बुलढाणा जिल्ह्य़ातील शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सेना सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. शेतकरी आंदोलनातही निष्पक्षपणे शेतकऱ्यांसोबत राहणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शेतकरी आंदोलन हा भूकंपाचाच एक भाग आहे. शेतकरी कर्जमुक्त झाले नाही तर राज्यात शेतकरी आणि शिवसेना भूकंप आणेल असा इशारा त्यांनी दिला. सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे, त्याची तंतोतंत अंमलबाजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो, अशी प्रार्थना करायला आपण गजानना चरणी आलो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मध्यावधीची मनसुबे पूर्ण होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नोटबंदीमुळे श्रीमंतांचे नुकसान झाले आणि गरिबांचा फायदा झाला, असे भाजप सांगत असले तरी नेमके नुकसान कुणाचे झाले, हे भाजपने जाहीर करावे, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. या पत्रकार परिषदेला पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उपनेते अरिवद सावंत, खासदार प्रतापराव जाधव, भावना गवळी, आमदार गुलाबराव पाटील, संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया, शशिकांत खेडेकर उपस्थित होते.

सालेम्हणणाऱ्यांना शेतकरी रडवणार

‘साले’ म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंसह भाजप नेत्यांवर लावला. शेतकऱ्यांनी दुबळे आहोत असे समजू नये, एकजुटीला तडा जाऊ देऊ नये, अन्यथा हाताशी आलेला घास निघून जाईल, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.

भारत कृषीप्रधान देश असतांना शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते. देशभरात शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. त्याचा उगम महाराष्ट्रातून झाल्याचा आनंद आहे.  आंदोलन पेटण्यापूर्वी सरकारने निर्णय घेतला याचा आनंद आहे. सत्तेत असतानाही आम्ही विरोधात उभे राहिलो. शेतकऱ्यांसाठी सत्तेत राहिलो काय किंवा नाही राहिलो याची पर्वा करीत नाही.  ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँका मोडण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.   उद्धव ठाकरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:36 am

Web Title: uddhav thackeray comment on bjp and devendra fadnavis
Next Stories
1 कर्जमाफीपासून एकही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही : मुख्यमंत्री
2 मुख्यमंत्र्यांचे मध्यावधी निवडणुकीचे मनसुबे उधळून लावू- उद्धव ठाकरे
3 राज्यात मध्यावधी निवडणुका नक्की कधी?
Just Now!
X