23 January 2021

News Flash

“भाजपाच्या राजकीय जिहादचं काय?”

"हिंमत असेल तर गोवंश हत्या बंदीवर केरळमध्ये निवडणूक लढवा"

संग्रहित छायाचित्र

देशात लव्ह जिहादचा मुद्यावरून बरंच राजकारण शिजत आहे. उत्तर प्रदेश सरकारनं अध्यादेश आणल्यानंतर मध्य प्रदेश आणि हरयाणा सरकारही कायदा आणण्याची तयारी करत आहे. महाराष्ट्रातही भाजपा नेत्यांकडून लव्ह जिहादविरुद्ध कायदा करण्याची मागणी होत आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीकाही होत असून, मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संजय राऊत यांनी सामनासाठी घेतलेल्या अभिनंदन मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी राऊत यांनी लव्ह जिहादचा मुद्दाही उपस्थित केला. “लव्ह जिहादचा एक नवीन विषय समोर आलाय…,” असं राऊत म्हणाले. “लव्ह जिहाद राजकारणात का नसावं? लव्ह जिहादचं राजकारण हा भाग वेगळा.. पण लव्ह जिहाद म्हणजे काय? मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध आहे. मग तुमची मेहबुबा मुफ्तीसोबत युती कशी चालली? नितीशकुमारांबरोबर कशी चालली? चंद्राबाबूंसोबत कशी चालली? ज्या ज्या युत्या तुम्ही केल्या… त्यात भिन्न विचारांचे पक्ष तुम्ही एकत्र येऊन युती चालते हे लव्ह जिहाद नाही? आहेच ना?. गोध्रा दंगलीनंतर रामविलास पासवान यांनी मोदींवर टीका करून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता… त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात. हे राजकीय लव्ह जिहाद नाही? आणि वापरून पुन्हा सोडून देणं… म्हणजे तलाक केलाच ना तुम्ही राजकारणातसुद्धा!,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- शरद पवार कमी उंचीचे नेते?, उद्धव ठाकरे म्हणतात…

“पण महाराष्ट्रात लव्ह जिहाद आहे का? कारण लव्ह जिहाद विरुद्ध कायदा करा अशी भाजपची मागणी आहे. कारण उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश…,” असा प्रतिप्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. “आम्ही ‘येस सर’ करून कायदा करू, पण तो करताना मी अनेकदा बोललो आहे, आजही परत सांगतो. तुम्ही गोवंश हत्याबंदीचा कायदा करा अगदी कश्मीर ते कन्याकुमारी… आता कश्मीरचं सगळं बंधन उठवलंय ना तुम्ही.. गोव्यात करा गोवंश हत्याबंदी, तुमचं सरकार आहे. इतरत्र करा… तुमच्याकडे ईशान्येतील राज्ये आहेत, तिथे करा गोवंश हत्याबंदी… का नाही करत? केरळ किंवा जिथे जिथे आजही सगळ्या गोष्टी चालू आहेत, तिकडे हा निवडणुकीचा मुद्दा करायचा आणि निवडणूक लढवायची… आणि मग लोकांनी मतं दिली तर कायदा करायचा… पण सोयीचं घ्यायचं… हे सोयीचं हिंदुत्व आम्ही नाही केलं… जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, जनतेच्या हिताचं असेल ते कर… मग ते आपल्याला गैरसोयीचं असलं तरी जनतेसाठी कर! राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ,” असा टोला ठाकरेंनी भाजपाला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 10:29 am

Web Title: uddhav thackeray interview abhinandan mulkhat narendra modi devendra fadnavis love jihad bmh 90
Next Stories
1 ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर देहविक्री करणाऱ्या महिलांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
2 शरद पवार कमी उंचीचे नेते?, उद्धव ठाकरे म्हणतात…
3 “कुटुंबावर किंवा मुला-बाळांवर येणार असाल तर…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
Just Now!
X