मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज(शनिवार) कोकणातील लघू पाटबंधारे योजनांचं ऑनलाईन उद्धाघटन झालं. यावेळी त्यांनी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे भाजपा नेते नारायण राणे यांना टोला लगावल्याचे दिसून आले. त्यांच्यी टीकेला नाराणयण राणे यांनी ट्विटपणे उत्तर दिलं आहे.

“मी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज हे स्वखर्चातून जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काढलेले आहे, सरकारी पैशातून नाही. श्रीयुत उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी.” असं नारायण राणे यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“अनेकदा भूमिपूजनं होतात, नारळ फुटतात आणि नंतर कोणी तिकडं कोणी फिरकत नाही. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, पण तुम्ही लोकं जी काही मागणी करत आहात, ती स्वतःसाठी करत नाही. मला स्वतःचं वैद्यकीय महाविद्यालय पाहिजे, रुग्णालय पाहिजे, तसं नाहीए. सत्ताधारी म्हणजे आपण सेवेकरी आहोत, या सत्तेचा स्वतःसाठी दुरूपयोग न करता, जे तुम्ही वैद्यकीय महाविद्यालयं मागितलेले आहेत, ते देखील सरकारी मागितलेले आहेत. नाहीतर स्वतःसाठी मागू शकत होता. सगळ काही मलाच पाहिजे, माझंच पाहिजे असा तुम्ही विचार केला नाही, म्हणून मला तुमचा अभिमान आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक हे असेच असायला हवेत.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते.

आणखी वाचा- …आणि आता मनसुख हिरेन, निष्पक्ष चौकशी होईल ना?; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल

भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अमित शाह आले होते. कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर चार वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याचे नारायण राणे  म्हणालेले आहेत.