01 October 2020

News Flash

भगवा आम्ही खाली ठेवलेला नाही, अंतरंगही भगवंच-उद्धव ठाकरे

वचनपुर्ती सोहळ्यात उद्धव ठाकरेंचा ज्येष्ठ शिवसैनिकांतर्फे सत्कार करण्यात आला.

“मी डरणारा नाही तर मी लढणारा आहे हे लक्षात असूदेत. मी वेगळा मार्ग स्वीकारला कारण मला खोटं पाडण्याचा प्रयत्न झाला. तेव्हाच्या मित्रपक्षाने मला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेला फसवण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये तुम्ही अदृश्य हातांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केलाच होता. मी जी जबाबदारी स्वीकारली होती ती माझ्या स्वप्नातही नव्हती. आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचं अंतरंग भगवंच आहे” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी टीका झाली. मात्र मला आज भाजपाला विचारायचं आहे की तुमचं काय काय उघड झालं? युती तर तुम्ही २०१४ लाच तोडली होती आणि आज आम्हाला नावं ठेवत आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

” आज माझा सत्कार करण्यात आला. मी मनापासून सांगतो मी नवीन जबाबादारी घेतल्यापासून एकही सत्कार स्वीकराला नव्हता. पण आजचा सत्कार मी स्वीकारला. कारण हा माझा सत्कार नाही. हा सत्कार तुमचा आहे. मी तुमचा कुटुंबप्रमुख आणि सेनापती आहे. मैदानात उतरल्यानंतर जी जबाबदारी माझ्या खांद्यावर येईल त्या जबाबदारीपासून मी कधीही पळ काढला नाही आणि काढणार नाही. ”

“अनेक शिवसैनिकांना आज मी धन्यवाद देतो. एक अप्रतिम आणि देखणा सोहळा तुम्ही इथे साजरा केलात. पण एक सांगतो ही माझी वचनपुर्ती नाही. तर वचनपुर्तीच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे. ही जबाबदारी मी जरुर स्वीकारली, ही एवढ्यासाठी स्वीकारली की ज्यावेळी आपल्या तेव्हाच्या मित्रपक्षाने दिलेलं वचन मोडलं. शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये दिलेलं वचन मोडलं. ते आपलं मंदिर आहे. मंदिरात दिलेला शब्द त्यांनी खाली पाडला आणि असं काही ठरलंच नव्हतं असं म्हणत मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. मी नुसता उद्धव ठाकरे नाही मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. मी डरणारा नाही, लढणारा आहे. तुमचा कुटुंबप्रमुख म्हटल्यानंतर जे मी बोललो ते बोललो. तुमच्यासमोर त्यांनी मला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला मी काय तुम्हाला तोंड दाखवलं असतं? ”

” तुमच्या मनातही माझ्याबद्दल काय भावना असती? शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलतोय? हे कदापि होणे नाही. प्राण गेला तरी चालेल तरीही मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो, जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणाने केलं. चोरुनमारुन केलं नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे.  ”

“मधल्या काळात एक टीका झाली की या सगळ्या समीकरणामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला. अरे २०१४ मध्ये तुम्ही आमच्यासोबतची युती तोडली होतीत. तेव्हाही तुम्ही अदृश्य हातांच्या साथीने तुम्ही सरकार स्थापन केलं होतं आणि आता दिलेला शब्द मोडल्यानंतर आमचा चेहरा उघड झाला असेल पण तुमचं काय काय उघड झालं? ते सगळ्या दुनियेने पाहिलं. ”

मुंबईत शिवसेनेचा वचनपुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार  मंत्री आदित्य ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर सगळ्यांना मंचावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं. या सत्कार सोहळ्याच्या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 10:02 pm

Web Title: uddhav thackeray slams bjp in his speech in mumbai scj 81
Next Stories
1 मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
2 पाकिस्तानी, बांगलादेशींना हाकलण्यासाठी मनसेचा महामोर्चा, राज ठाकरे भेटणार अमित शाह यांना
3 आमची आरती त्रास देत नाही तुमचा नमाज का त्रास देतो?-राज ठाकरे
Just Now!
X