News Flash

उद्धव ठाकरे म्हणतात, “आजपर्यंत हुतात्मा चौकात अनेकदा गेलो आहे, मात्र आज…”

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी साधला संवाद

उद्धव ठाकरे

मुंबईतील हुतात्मा चौकात मी अनेकदा गेलो आहे मात्र आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तिथे अभिवादन करताना अंगावर रोमांच उभा राहिला अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्र दिनानिमित्त उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा, वेगवगळे कार्यक्रम घेण्याचा विचार केला होता मात्र सध्य परिस्थितीमध्ये काही पर्यायच हाती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

फेसबुकच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधताना आज हुतात्मा चौकामध्ये अभिवादन करण्यासाठी गेलो असता जुन्या आठवणी आठवल्याचे सांगितले. “महाराष्ट्र दिन म्हटल्यावर सहाजिकच मला जुन्हा आठवणी आठवतात. ज्या मला माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी म्हणजेच शिवसेना प्रमुखांनी सांगितल्या आहेत. तो काळ संघर्षाचा आणि लढ्याचा होता.,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच संयुक्त महाराष्ट्राला मुंबई बिलदान करुन मिळाली असल्याच्या भवना उद्धव यांनी व्यक्त केल्या. “मुंबई जी काही आपल्याला ती अशीच मिळाली नाही. बलिदान करुन ही मुंबई आपल्याला मिळाली आहे,” असं उद्धव म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी मंत्रालयामध्ये जाऊन ध्वजारोहण केलं. उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत आज हुतात्मा चौकात पोहचले. हुतात्मा चौकामध्ये उद्धव यांनी महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या १०७ जणांच्या स्मृतींना अभिवादन केलं. याबद्दल बोलताना, “आज सकाळीच मी हुतात्मा स्मारकाला वंदन करुन, मंत्रालयामध्ये ध्वाजारोहण करुन आलो. आजपर्यंत हुतात्मा चौकात अनेकदा गेलो आहे. पण आज जे काही मी तिथे गेलो होतो. ज्या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी बलिदान केलं त्या हुतात्म्यांच्या स्मारकाला वंदन करताना मी मुख्यमंत्री म्हणून वंदन करत होतो. त्यामुळेच एक क्षणभर का होईना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. खरं तर या भावना मी शब्दात व्यक्त करु शकत नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

या लढ्यामध्ये माझे घराणंच सहभागी झालं होतं. ती एक चळवळ होती. या चळवळीमध्ये, लढ्यामध्ये माझे आजोबा अग्रणी होते. शिवसेनाप्रमुख तसेच त्यांच्याबरोबर माझे काकाही या लढ्यात सहभागी झाले होते. आज मला या तिघांची तर आठवण आलीच पण त्यावेळाला ज्या घरातून हे सर्व काही होतं होते. अनेकदा बैठका होत होत्या, लढ्याची दिशा ठरवल्या जात होत्या. अनेकजण यामध्ये होते. मग कधी मला घरी येणारे सेनापती बापट, शाहीर अमर शेख आठवले, किती नावं घेऊ. पण त्या सर्वांमध्ये मला माँ देखील आठवली” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 1:46 pm

Web Title: uddhav thackeray talked about paying tribute at hutatma chowk on maharashtra day scsg 91
टॅग : Maharashtra Day
Next Stories
1 Coronavirus: ३ मे रोजी लॉकडाउन संपणार का? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
2 टाळेबंदी म्हणजे एकप्रकारचा गतीरोधक; करोनाची साखळी तोडण्यासाठी फायदा : मुख्यमंत्री
3 महाराष्ट्र करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात बराच यशस्वी : उद्धव ठाकरे
Just Now!
X